Page 1
माफीनामा...
जय जगदंब!
साधकांनो! जेव्हा आपल्या जीवनात, परिवारात असे काही संकटे, दुर्मिळ आजार यासारखे भोग येतात कि ते टाळण्यासाठी कोणतेच उपाय काम करत नाही.या भोगातुन आपल्याला कोणीच वाचवु शकत नाही.व ते भोग पुर्ण आपल्याला भोगावेच लागतात.
अशा वेळी एकच उपाय उरतो तो म्हणजे
आपल्या गुरु जवळ अंतःकरणा पासून माफी
नामा प्रार्थना करावी.या माफीनामा प्रार्थनेत प्रचंड अशी ताकद आहे.कि आपल्या जीवनात आलेले भोग चुकणार तर नाही,पण,ते भोग लवकरात लवकर भोगुन होतील.व आपल्या जीवनातील संकटे, दुर्मिळ आजार पुर्ण बरे होतील.
हि माफीनामा प्रार्थना गुरु जवळच का करावी? कारण गुरुच आपल्याला वाचवु शकतो.अन्य कोणती देवता नाही.
एक वेळ ब्रम्हा, विष्णु,महेश कोपले तर आपल्याला गुरु वाचवेल,पण गुरु कोपला तर कोणीच वाचवु शकत नाही.म्हणुन प्रत्येकानं जीवनात पहिले गुरु करावाच.कारण तेच एकमेव आपले आश्रय स्थान आहे.
आपल्या गुरु जवळ हि माफीनामा प्रार्थना
रोज ३,६,९ याप्रमाणे म्हणजे सकाळी ३ वेळा, दुपारी ६ वेळा आणि रात्री झोपण्यापूर्वी ९ वेळा प्रार्थना करावी.
या माफीनामा प्रार्थना मुळं आपण आपल्या विविध असाध्य संकटे, असाध्य आजार यापासून त्वरित मुक्तता मिळवु शकतो. या माफीनामा प्रार्थनेचा असर आपल्याला तीन महिण्यातच दिसुन येतो.
ऐवढी प्रचंड ताकद या माफीनामा प्रार्थनेत आहे.
माफीनामा प्रार्थना पुढीलप्रमाणे करावी.
आपल्या देवघरात एक तुपाचा दिवा अथवा
बर्थडे ची जी मेणबत्ती असते ती लावावी.
व आपल्या गुरुदेवांचे स्मरण करुन माफीनामा प्रार्थना करावी.